बिबा नगरातून ठेकेदाराची दुचाकी लांबविली

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पिंप्राळा शिवारातील बिबानगर परिसरातून ठेकेदाराची २० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे.  याबाबत रविवार २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, नाना मोतीलाल पाटील (वय ५५, रा. पिंप्राळा शिवार, बिबा नगर जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. ते ठेकेदारीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत असतात. शनिवार २० ऑगस्ट रोजी मध्यरात्री १.३० ते सकाळी ४ वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरासमोर  दुचाकी क्र. एमएच १९  डीटी ५३६) अज्ञात चोरट्यांनी चोरून देण्याचा प्रकार उघडकीला आला आहे. त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला. परंतु, दुचाकी कुठेही मिळून न आल्याने अखेर रविवार २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक उमेश ठाकूर करीत आहे.

 

Protected Content