Home क्राईम धावत्या रेल्वेतून पडल्याने तरूण गंभीर जखमी

धावत्या रेल्वेतून पडल्याने तरूण गंभीर जखमी

0
126

jakhami

जळगाव प्रतिनिधी । धावत्या रेल्वेतून 25 वर्षीय तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास आसोदा रेल्वे गेटजवळ घडली. वाहतूक पोलीसांनी माणूसकी दाखवत त्याला रूग्णवाहिकेतून जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

 

वाहतूक पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देबाशिश नंदलाल जना (वय-25), च्छत्रा पार्ट, इगरा पुरबो, छत्री, पश्चिम मिदनापूर, पश्चिम बंगाल हा तरूण मुंबईकडून भुसावळकडे जाणारे एका धावत्या रेल्वेतून जात असतांना असोदा रेल्वेच्या जवळ दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास खाली पडला. रेल्वेतून खाली पडल्याचे नाक्यावर गस्त असलेले वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल राहूल कुमावत यांच्या लक्षात आले. त्यांनी योगेश पाटील या तरूणाच्या मदतीने जखमीस जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. याबाबत अद्याप पर्यंत पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.


Protected Content

Play sound