फैजपूर येथे नौ. उस्मान यांचे मनोगत कार्यक्रम

phaijapur

फैजपूर प्रतिनिधी । प्रत्येक माणासाने स्वता:चे आचरण करणे गरजेचे आहे. मृत्यूनंतर कार्याचे हिशोब ईश्वर-अल्लाह समोर द्यावे लागते. महापुरुषांना डोक्यावर न घेता त्यांची शिकवण डोक्यात घेणे गरजेचे आहे. सामाज घडविण्याचे काम करावे असे प्रतिपादन मिडीया सेल जमाते इस्लामी प्रमुख नौशाद उस्मान यांनी केले.

याबाबत माहिती अशी की, येथील न.पा. सभागृहात शुक्रवारी जमाते इस्लामी हिंद शाखा तर्फे आयोजित ईद मिलन कार्यक्रमात नौशाद उस्मान यांनी योजकांना व उपस्थितांना शुभेच्छा देवून आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रांताधिकारी थोरबोले म्हणाले कि, कुरआनची शिकवण हि पवित्र शिकवण आहे. याचे आचरण प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. जेणेकरून नवीन युवा पिढीला समाजामध्ये क्रांती घडविण्यास मदत होईल. या कार्यक्रमाला उपस्थित नौशाद उस्मान (मिडीया सेल जमाते इस्लामी प्रमुख, औरंगाबाद), प्रांताधिकारी अजित थोरबोले, मौ. समी (जिल्हा संघटक, जमाते इस्लामी), अ. रऊफ जनाब, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक हेमराज चौधरी, भाजप पालिका गटनेते मिलिंद वाघूळदे, पालिका विरोधी पक्ष नेता शेख कुर्बान, समाजसेवक रवींद्र होले, रईस मोमीन, शेख इम्रान देवेंद्र साळी, चंद्रशेकर चौधरी, वसीम खान, रघुनाथ कुंभार, समाजीक कार्यकर्ते, पत्रकार, डॉक्टर व कार्यक्रम यशिस्वीतेसाठी जमाते इस्लामी शाखा अध्यक्ष अमान उल्ला जनाब, युथ विंग शहर अध्यक्ष शेख इरफान, नगरसेवक डॉ. इम्रान व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मो. अबुबकर जनाब केले तर आभार अ. रऊफ जनाब यांनी मानले.

Protected Content