चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात असलेल्या एकाची पानटपरी फोडून दुकानातील १७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश वाल्मीक भवर (वय-४२) रा. कृउबा समिती समोरील रामवाडी, चाळीसगाव हा कुटुंबियासह वास्तव्याला आहे. ते पानटपरी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. बुधवार २२ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता त्यांनी पानटपरी बंद करून घरी निघाले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पानटपरी फोडून दुकानातील सिगारेटचे पाकीट तंबाखूचे पुढे व रोकड असा एकूण १६ हजार ९६५ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे सकाळी ६ वाजता उघडकीला आले. याप्रकरणी रमेश भवर यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास परिक्षण पोलीस उपनिरीक्षक हेमंत शिंदे करीत आहे.