जाब विचारल्याच्या कारणावरून महिलेसह मुलावर चॉपर हल्ला

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवीगाळ करीत असल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेसह तिच्या मुलावर चॉपर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मटन मार्केट जवळ घडली आहे. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात करण्यात आले आहे.

 

मुनकाबाई बिऱ्हाडे (वय-४०) आणि मंगल सचिन बिऱ्हाडे (वय-२०) असे जखमी झालेल्यांची नावे आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील मटन मार्केट जवळील असलेल्या वसाहतीमध्ये मूनकाबाई या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. शुक्रवारी १ एप्रिल रोजी संध्याकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास दीपक गायकवाड हा त्यांना विनाकारण शिवीगाळ करीत होता. त्याला जाब विचारण्यासाठी मनूकाबाई या गेल्या असता दीपक याने त्यांच्या डोक्यावर चॉपरने वार करून जखमी केले. दरम्यान, आईवर वार झाल्याने त्याला अडविण्यासाठी गेलेला त्यांचा मुलगा मंगला याच्यावर देखील दीपकने वार करीत जखमी केले. दोघांवर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. याबाबत अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content