कोरोना महामारीच्या कठीण प्रसंगात दानशूरांची गरज – खा.उन्मेश पाटील

चाळीसगाव प्रतिनिधी । समस्त चाळीसगावकर जनतेसाठी साडेबारा कोटी रुपये खर्चून महात्मा फुले जन आरोग्य संकुल ट्रामा केअर सेंटर भव्य दिव्य विस्तीर्ण वास्तू साकारली गेली आहे. त्यामूळे आज मोठा दिलासा रुग्णांच्या नातेवाइकांना मिळतो आहे. तसेच शहरवासीयांच्या दातृत्वातून सुसज्ज कोविड सेंटर आज रुग्णांचे प्राण वाचवित आहे. सध्याची कोरोना महामारी पाहता रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशा गंभीर परिस्थितीमध्ये सर्वांनी आपल्याकडे वेळ असेल तर समाजासाठी वेळ द्यावा, श्रम देणे शक्य असेल तर श्रम द्यावे आणि ज्यांना आर्थिक मदत देण्याची कुवत असेल यांनी आर्थिक मदत करून या आरोग्य संकुलास  कशी मदत देता येईल.यासाठी प्रयत्न करावेत. आज कोरोना महामारीच्या कठीण प्रसंगात समाजाला दानशुरतेची गरज आहे. अशी भावना खासदार उन्मेश पाटील यांनी आज येथे व्यक्त केले. चाळीसगाव शहरातील नामवंत उद्योजक व दानशूर परिवार अशी ख्याती असलेले व्ही एच पटेल परिवाराच्या वतीने तसेच खासदार उन्मेश पाटील यांच्या उपस्थितीत आज दुपारी दोन वाजता शहरातील ट्रामा केअर सेंटरसह सुमारे सात बायपॅप मशीन भेट देण्यात आले.

यावेळी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या हस्ते  व्हि. एच. पटेल परिवाराचे सदस्य उद्योजक अशोकभाई पटेल, जितेंद्रभाई पटेल, विजयभाई पटेल, ऋतुल पटेल यांचा सत्कार करण्यात आला. सुरुवातीला पटेल परिवाराच्या शुभहस्ते बायपॅप मशीन  ट्रॉमा केअरकडे सुपूर्द करण्यात आले  अशोकभाई पटेल यांनी आपल्या भावना व्यक्त केली ते म्हणाले की आज एखाद्या तारांकित हॉस्पिटल प्रमाणे सुसज्ज ट्रामा केअर सेंटरची भव्य वास्तू पाहून  मनाला आनंद झाला आहे. आज कोविड केअर सेंटर मधून शेकडो रुग्णांची वैद्यकीय सेवा होत असल्याने चाळीसगावकरांसाठी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अधिक प्रभावी सुविधा देता यावी. याकरीता सात बायपॅप मशीन यांना उपलब्ध करून दिले आहेत.यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे यांनी प्रास्ताविक केले.  खासदार उन्मेशदादा पाटील पुढे म्हणाले की महात्मा फुले जन आरोग्य संकुल ही वस्तू उभी राहिल्याने  गोरगरीब, सर्वसामान्य जनतेला या कठीण प्रसंगात वैद्यकीय सेवा मिळत आहे. या वास्तूत मोठी जागा उपलब्ध असुन अजून अधिक रुग्णांना मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा देता यावी. 

यासाठी देणाऱ्याने देत जावे या म्हणीप्रमाणे दानशूर समाज बांधवांची गरज आहे. देणाऱ्याने देत जावे. या म्हणीप्रमाणे दानशूर  व्यक्तिमत्त्वांकडून अजून मोठी मदतीची गरज असल्याची अपेक्षा खा.पाटील यांनी व्यक्त केली. दिवसरात्र सेवा देणारे आरोग्य कर्मचारी, अधिकारी यांचे  देखील खासदार उन्मेश पाटील यांनी रुग्णांच्या वतीने आभार व्यक्त केले. यावेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे, ग्रामीण रुग्णालयाचे आय सी यू विभागप्रमुख डॉ. मंगेश वाडेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदार करंबळेकर , जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब जाधव,जिल्हा परिषद सदस्य अनिलभाऊ गायकवाड, पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. मंदार करंबळेकर यांनी  मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की खासदार उन्मेश पाटील यांच्या दूरदृष्टी आणि नियोजनातून महात्मा फुले जन आरोग्य संकुलाची भव्यदिव्य वास्तू तयार झाली आहे. ही भौतिक सुविधा उपलब्ध असल्याने कोविड आरोग्य व्यवस्था उभारणे सोयीचे झाले आहे. आज या आरोग्य संकुलातून शेकडो रुग्णांचे प्राण वाचण्याची भाग्य  लाभत असल्याचे सांगून त्यांनी पटेल परिवाराप्रती त्यांनी आभार व्यक्त केले.

याप्रसंगी उद्योजक उदयदादा पवार, रोटरी क्लबचे समकित छाजेड, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्रकाका जैन, बहाळ उपसरपंच प्रमोदआण्णा पाटील,  मेहूणबारे ग्रामपंचायत सदस्य प्रदीप देवरे,ज्येष्ठ कार्यकर्ते बंडू पगार, सोनू अहिरे, बबडी शेख, अमोल मराठे, कल्पेश पाटील, कैलास गावडे, गौरव पुरकर आदि पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आरोग्य कर्मचारी डॉ. चंद्रकला चव्हाण, रणजित गव्हाळे, राहुल पवार, धनंजय देसले, अभिजीत देशमुख, स्टाफ इन्चार्ज सुवर्णा पवार , चेतन गुढेकर उपस्थित होते. व्ही. एच.पटेल परिवाराच्या वतीने डॉ.राहुल वाघ,डॉ.मंगेश वाडेकर यांच्या हॉस्पिटलमध्ये देखील एक एक युनिट भेट देण्यात आले.

 

 

 

 

 

Protected Content