प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करा ( व्हिडीओ )

 

पाचोरा, नंदू शेलकर । तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ यांच्याकडे निवेदन देऊन ही मागणी करतांना काँग्रेस समितीने आरोग्य कर्मचार्‍यांना मास्कचे वाटप देखील केले. पहा याबाबतचा व्हिडीओ वृत्तांत.

 

पाचोरा तालुक्यातील कोरोना संसर्ग लक्षात घेता शहरात आणि ग्रामीण भागातील जनतेचे खूप हाल होत आहेत. खाजगी कोविड सेंटरमध्ये पैशाअभावी काहींना जीव गमवावा लागला आहे. आधीच ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून आर्थिक हानी झाली आहे. त्यामुळे तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर तात्काळ सुरू करुन अॉक्शिजन बेड उपलब्ध करावे अशी मागणी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ यांच्याकडे कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे.

 

यावेळी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली शिष्टमंडळात तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, आरोग्य सेवा सेल तालुकाध्यक्ष डॉ. फिरोज शेख, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुकाध्यक्ष कल्पेश येवले आदी उपस्थित होते.  नवीन कोविड सेंटर लवकरच सुरू करु लोहटार प्राथमिक आरोग्य केंद्रात पहीला प्रयोग करु असे आश्वासन डॉ. समाधान वाघ यांनी दिल्यानंतर लगेच याठिकाणी कर्मचारी वर्ग आणि रुग्णांना कॉग्रेसकडुन मोफत मास्कचे किट डॉ. समाधान वाघ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. चर्चेत अॉक्शिजनसाठी तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी लागलीच कॉन्ट्रॅक्टर अबुलेस शेख यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी डॉ. समाधान वाघ यांना उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. कोरोना महामारीत प्रत्येक कॉग्रेस कार्यकर्त्याने ग्रांउड लेवलला कार्य करावे असे देशाच्या नेत्या सोनिया गांधी, खा. राहुल गांधीसह प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले  आहेत. पाचोरा कॉग्रेस लवकरच हेल्पलाईन सुरू करीत असल्याचेही त्यांनी  सांगितले.

 

 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/307636867423399

Protected Content