पहूर शिवारातून इलेक्ट्रिक पाणबुडी व केबल वायरची चोरी

पहूर ता. जामनेर प्रतिनिधी । पहूर शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतातून इलेक्ट्रिक पाणबुडीची मोटार व कॉपर केबलची चोरी झाल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, रितेश शिवाअप्पा गोळंबे (वय-३६) रा. हनुमानगल्ली फत्तेपुर ता. जामनेर जि. जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ ते रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतात असलेल्या गट नंबर १८/१ मधून शेतातील ८ हजार रुपये किंमतीची इलेक्ट्रिक पाणबुडी मोटार आणि तिला जोडलेली ७० फूट कॉपर वायर तसेच १ हजार रुपये किमतीची प्लॅस्टिकची टाकी असा एकूण ९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी शेतकरी रितेश गोळांबे यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण चौधरी करीत आहे.

 

Protected Content