दिल्ली – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसंस्था | पाकिस्तानात राजकारणाचा खेळ खंडोबा होत असून आपला पराभव समोर दिसत असल्याने पंतप्रधान इम्रान खान यांची चिटिंग करत संसद बरखास्त केली आहे. त्यामुळे पुढील ९० दिवसांच्या आत नवीन निवडणूका होणार असल्याचे सांगितले जात आहे.
पाकिस्तानमध्ये शेवटची राजकीय इनिंग खेळणाऱ्या पंतप्रधान इम्रान खान यांनी आपण हरणार हे समोर दिसत असल्याने गनिमी कावा खेळत संसद बरखास्त केली आहे. उपसभापती यांनी मतदान न घेता विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव फेटाळून लावला.
त्यानंतर इम्रान खान यांनी संसद बरखास्त करण्याची घोषणा केली. त्यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती संसद आणि विधानसभा बरखास्त केली आहे. इम्रान खान यांच्या निर्णयाविरोधात विरोधी पक्षांनी आंदोलन सुरू केला असून यापुढे त्यानी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची घोषणादेखील केली आहे.
त्यामुळेच पाकिस्तानची राजकीय अस्थिरता कायम असून आणि पुढे नेमके काय होणार ? याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहे.