शिवाजी नगरातून तरूण बेपत्ता

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवाजी नगरातील दुध फेडरेशन परिसरातील ३२ वर्षीय तरूण कामावर जात असल्याचे सांगून बेपत्ता झाला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, शिवाजी नगरातील दुध फेडरेशन भागात हेमंत राजेंद चौधरी (वय-३२) हा तरूण आपल्या पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला आहे. कलर पेंटरचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. शनिवार २ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता कामावर जातो असे पत्नी गायत्री चौधरी यांना सांगून घराबाहेर पडले. त्यावेळी हेमंत चौधरी यांनी त्यांचा मोबाईल घरीच ठेवला होता. रात्री ९ वाजेपर्यंत हेमंत घरी आला नाही. यामुळे त्यांची पत्नी गायत्री यांनी नातेवाईक व मित्रांकडे शोधाशोध केली परंतू कुठेही आढळून आला नाही. रविवार ३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता गायत्री चौधरी यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून माहिती दिली. त्यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीत आहे.

Protected Content