उत्तर प्रदेशात पोलीस आणि गुंडांमध्ये तुफान धुमश्चक्री ; डीएसपीसह ८ पोलीस शहीद

कानपूर (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील कानपूर जवळील डिकरु गावात गुन्हेगारांशी झालेल्या धुमश्चक्रीत आठ पोलिसांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर आणखी चार पोलीस गंभीररित्या जखमी झाले आहेत. . या घटनेमुळे उत्तर प्रदेशात मोठी खळबळ उडाली आहे.

 

रुवारी रात्री एक वाजेच्या सुमारास पोलिसांचे एक पथक विकास दुबे या कुख्यात गुंडाला पकडण्यासाठी गेले होते. सुरुवातीला पोलिसांच्या गाड्या अडवण्यासाठी गुंडांनी जेसीबी उभा करुन रस्ता अडवला. यानंतर पोलीस जेव्हा गाड्यांमधून बाहेर आले त्यावेळी जवळपास १५ ते १६ गुंडांनी छतावरून पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. या अंदाधुंद गोळीबारात डीएसपी देवेंद्र मिश्रा आणि स्टेशन प्रभारी यांच्यासह 8 पोलीस शहीद झाले. विकास दुबेविरोधात कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल असून, हे पोलीस पथक त्याला पकडण्यासाठी गेले होते. त्यानंतर दुबेच्या गुंडांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात डीएसपीसह ८ पोलीस शहीद झाले. या चकमकीत जखमी झालेल्या चार पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृतीही गंभीर असल्याचे समजते. गुंडांनी चकमकीनंतर पोलिसांचे शस्त्रेही पळवून नेली आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एसटीएफ टीमला कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यूपीच्या सर्व सीमांना पोलिसांनी सील ठोकले आहे.

Protected Content