इम्रान खानही घेणार ट्रम्प यांची भेट

imaran khan

 

न्यूयॉर्क वृत्तसंस्था । हाऊडी मोदी कार्यक्रमामुळे मनातून धास्तावलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्याचे ठरवले आहे. ही भेट येत्या सोमवारी, ३० सप्टेंबर रोजी होणार आहे.

आठवडाभराच्या भेटीसाठी इम्रान खान यांचे येथे आगमन झाले असून ते संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेला आज, मंगळवारी उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी ट्रम्प आणि इम्रान खान यांची भेट व्हाइट हाऊस येथे जुलैमध्ये झाली होती. त्यावेळी ट्रम्प यांनी काश्मीरप्रश्नी भारत व पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यानंतर भारताने जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केले. हे कलम रद्द केल्यानंतर भारत व पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, ट्रम्प आणि इम्रान यांच्या भेटीविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Protected Content