एरंडोल येथे शिवसेनाची महत्वपुर्ण बैठक; जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांचे मार्गदर्शन

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी विधानसभा निवडणुकीचा पार्श्वभूमीवर एरंडोल शहर व तालुका शिवसेना, युवासेनेची महत्वपुर्ण बैठक एरंडोल येथे पार पडली. यावेळी सभासद नोंदणी, बुथ पातळीवरचे नियोजन, सध्या राज्य शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना यांसह विविध प्रभावी योजनांची प्रत्येक बुथनिहाय अमंलबजावणी, गोर-गरिब, शेतकरी-कष्टकरी, सर्वसामान्य नागरिकांना योजनांचा लाभ कसा मिळवुन देता येईल यासाठी उपाययोजना, नविन मतदार नोंदणी अभियान व पक्षसंघटनेसह विविध विषयांबाबत जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी मार्गदर्शन व सुचना केल्या.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख प्रा.मनोज पाटील, जि.प.माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, बाजार समिती माजी सभापती शालिक गायकवाड, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदाम राक्षे, जिल्हा बँकेचे माजी संचालक डॉ.सतिष देवकर, पं.स.मा.सभापती बापु पाटील, रवंजे सरपंच देविदास चौधरी, तळई सरपंच दादा पाटील, शहरप्रमुख आनंदा चौधरी, बाजार समिती माजी संचालक गजानन पाटील, माजी तालुकाप्रमुख बबलु पाटील, युवासेना तालुकाप्रमुख कमलेश पाटील, बाजार समिती संचालक किरण पाटील, नगरसेवक कुणाल महाजन, बबलु चौधरी, तालुकासंघटक संभा पाटील, शहरसंघटक मयुर महाजन, व्यापारी आघाडी तालुकाप्रमुख परेश बिर्ला यांचेसह शिवसेना, युवासेनेचे आजी-माजी पदाधिकारी, विविध गावांचा ग्रामपंचायतींचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध गावांचा विविध कार्यकारी सोसायटींचे आजी-माजी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक व शिवसैनिक उपस्थित होते.

Protected Content