आमदारांच्या उपस्थितीत मुक्ताईनगरात ‘रुग्ण कल्याण समिती’ची बैठक संपन्न

मुक्ताईनगर प्रतिनिधी | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व इतर रुग्णालयीन समस्यांबाबतीत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार मुक्ताईनगर व बोदवड आरोग्य विभागासासाठी रुग्ण कल्याण समितीची महत्वपूर्ण बैठक येथील मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात पार पडली. यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आले.

शनिवार, दि.15 जानेवारी रोजी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात संपन्न झालेल्या या बैठकीत आमदार चंद्रकांत पाटील, निवासी जिल्हा शल्यचिकित्सक सुशांत सुपे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.योगेश राणे, बोदवड तहसिलदार प्रथमेश घोलप, मुक्ताईनगरचे नायब तहसिलदार वाडे, बोदवड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, एकात्मिक बालविकास विभागाचे अधिकारी, बोदवड व मुक्ताईनगर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यासह विविध विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी तसेच रुग्ण कल्याण समितीचे सदस्य प्रशांत टोंगे, प्रफुल्ल पाटील आदींची उपस्थिती होती.

बैठकीत खालील महत्वपूर्ण विषयांवर चर्चा व ठराव करण्यात आले.

1) मागील सभेपासून झालेल्या खर्चास मंजूरी देणे

अ) रुग्ण कल्याण समिती अंतर्गत झालेल्या खर्चास मंजूरी देणे
ब) वार्षिक देखभाल निधी अंतर्गत झालेल्या खर्चास मंजूरी देणे
क) संबधित निधी अंतर्गत झालेल्या खर्चास मंजूरी देणे
ड) जननी सुरक्षा योजना अंतर्गत इंधन देयकासाठी झालेल्या खर्चास मंजूरी देणे.
इ) ‘कोविड १९’ अंतर्गत पदे भरणे, स्वच्छता सेवकांची पदे भरणे, रुग्णालयातील विभागांची स्वच्छता, साफसफाई करणे व त्यासाठी होणारे खर्चाबाबत चर्चा करणे व त्यांस मंजूरी देणे.
ई) ‘कोविड १९’ अंतर्गत साहित्य सामग्री खरेदी करणे, औषधे खरेदी करणे व त्यासाठी होणारे खर्चाबाबत चर्चा करणे व त्यांस मंजूरी देणे.
फ) ऑनकॉल बेसिस स्त्रीरोग तज्ञ, भुलतज्ञ व इतर बाबींसाठी लागणा-या खर्चाबाबत चर्चा

2) यासह उपजिल्हा रुग्णालय परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याने येथील शवविच्छेदन गृह नव्याने बांधकाम करणे.

3) रुग्णालय परिसरात सुरक्षा रक्षक तोकडे पडत असल्याने येथे जवळपास 10 सुरक्षा रक्षक मिळावे अशी मागणी करण्यात आली . व यासंदर्भात ठराव घेण्यात आला.

4) येथील स्वच्छता कंत्राट संपलेला असून केवळ एक स्वच्छता कर्मचारी येथे असतो त्यामुळे रुग्णालयाची प्रशस्त इमारत व परिसर यासाठी एका कर्मचाऱ्याद्वारा स्वच्छता ठेवणे कठीण असल्याने येथे किमान 10 स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली व यासंदर्भात ठराव घेण्यात आला.

5) औषध भांडारातील औषधांची गुणवत्ता 40 ते 45 अंश तापमानात टिकत नसल्याने येथे अत्याधुनिक वातानुकूलित औषध भांडार बांधकाम करणे जेणेकरून औषध साठा गुणवत्ता पूर्ण टिकून राहील.

‘ब्लड स्टोरेज’ची व्यवस्था उपजिल्हा रुग्णालयात आहे. परंतु येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ व परवानगी प्रक्रिया नसल्याने प्रसूती व शस्त्रक्रिया यासाठी मोठी अडचण होते व रुग्णांची फरफट होत असते.त्यामुळे येथे तात्काळ प्रयोगशाळा तंत्रज्ञ देऊन रखडलेली परवानगी प्रक्रिया तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना आमदारांनी निवासी जिल्हा शल्य चिकित्सक यांना बैठकित केल्या.

6) तसेच येथील सर्जन, फिजिशियन, स्त्रीरोगतज्ज्ञ ही महत्त्वाची पदे रिक्त असल्याने येथे गरोदर महिलांची प्रसूती, इतर शस्त्रक्रिया, हर्निया ,हायड्रोसील सारख्या शस्त्रक्रिया होणे मुश्किलीचे होते त्यामुळे सदरील पदांच्या तात्काळ कंत्राटी असतील किंवा नियमित नियुक्त्या मिळाव्यात यासाठी ठराव करण्यात आला.

 

Protected Content