आजारी पडलेल्या तालुक्याला डॉक्टर आमदार निवडून देण्याची गरज – डॉ. कोतकर (व्हिडीओ)

Dr Kotkar news

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव तालुकावासियांनी आत्तापर्यंतवकील, प्राध्यापक, राजकारण, इंजिनिअर असे आमदार निवडणून दिले. मात्र आता आजारी पडलेल्या तालुक्याला डॉक्टर आमदार निवडून देण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया चाळीसगाव विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार डॉ. विनोद कोतकर यांनी दिली.

ही निवडणूक चाळीसगाव शहरात सांस्कृतील वारसा जपणारी आहे, ही निवडणूक चाळीसगाव विभागाची धनशक्ती विरूध्द सज्जनशक्ती अशी आहे. चाळीसगाव शहराची दुग्ध, सांस्कृतीक, शैक्षणिक, कापडविणकार नगरी अशी ओळख निर्माण होती. आज मात्र दुर्दैवाने चाळीसगाव हे वाळूमाफिया, गुटखाकिंग, अवैधधंद्यांची नावाने ओळखले जात आहे. हे कुठेतरी थांबविले पाहिजे यासाठी जनता राजाने आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. येणाऱ्या निवडणुकीत चाळीसगाव नगरीची संस्कृतीक, शैक्षणिक व कापडविणकार नगरी ओळख जपणारा उमेदवाराला आमदार म्हणून निवडून द्यायचा आहे. यासाठी उच्चशिक्षित उमेदवार निवडून देण्याची परंपरा चाळीसगाव तालुक्याने दिले आहे. आत्तापर्यंत वकील, प्राध्यापक, राजकारण, इंजिनिअर असे आमदार दिले आहे. आता आजारी तालुक्याला डॉक्टर आमदाराची गरज आहे. तालुक्याचा विकास होण्यासाठी आपण कटिबध्द असल्याची प्रतिक्रिया अपक्ष उमेदवार डॉ. विनोद कोतकर यांनी दिली.

Protected Content