जळगावात करण पाटील यांचा प्रचार : ठिकठिकाणी स्वागत

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांनी आज जळगाव शहरातून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. यात ठिकठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

आज जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १ मधून करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारास प्रारंभ झाला. जळगाव शहरातील राजमालतीनगरातील श्री हनुमान मंदिर आणि जिल्हा दूध संघासमोरील साईबाबा मंदिरात नारळ ओवाळून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. त्यांनी आपल्या सहकार्‍यांसह राजमालतीनगर, दूध फेडरेशन परिसर, इंद्रप्रस्थनगर, श्री लक्ष्मीनगर, छत्रपती शिवाजी नगर, गेंदालाल मिल आदी भागातून प्रचार रॅली काढली. यात ठिकठिकाणी त्यांचे अतिशय उत्स्फुर्तपणे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी महाविकास आघाडीच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान, करण पाटील यांच्या उपस्थितीत निघालेली महाविकास आघाडीचे प्रचार फेरी राजमालतीनगर, दूध फेडरेशन परिसर, महावीर नगर, राधाकृष्ण नगर, भारतनगर, इंद्रप्रस्थ नगर, श्री लक्ष्मी नगर, छत्रपती शिवाजी नगर, खडके चाळ मार्गे गेंदालाल मिल आदी भागातून काढण्यात आली. रेल्वे स्टेशनजवळील मौला अली मुश्किल कुशा बाबा दर्गा येथे प्रार्थना करून या प्रचार फेरीचा समारोप करण्यात आला.

या प्रचार रॅलीत महाविकासआघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, जळगावच्या माजी महापौर जयश्री महाजन, उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, गणेश गायकवाड, राष्ट्रवादी कॉंगेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस नामदेव चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष राजेश पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मंगलाताई पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष वाल्मिक पाटील, भारत मुक्ती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, डेबुजी फोर्सचे अध्यक्ष सागर सपके, माजी नगरसेवक सुनील माळी, पार्वताताई भिल, प्रा. अस्मिता पाटील, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष अमृता नेरकर, शहराध्यक्ष दीपक माने, सचिव राजू निकम, उपाध्यक्ष सिमा बिर्ला, कोषाध्यक्ष सुनील निकम, सहसचिव सागर निकम, निर्मला निकम, शिवसेनेचे विभाग प्रमुख अण्णा भोईटे, ज्येष्ठ नेते सुभाषजी सांखला, निलेश मिश्रा, विजय कोळी, शरद बारी, रितेश बाविस्कर, माजी नगरसेवक इब्राहिम पटेल, शकील बागवान, राष्ट्रवादी कॉंग्रेस विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गौरव वाणी, रहीम तडवी, गोकुळ चव्हाण, माजी नगरसेवक राजू मोरे, शहर उपाध्यक्ष किरण राजपूत, श्रीकांत आमले, नीता सांगोळे, छाया कोळी, योगिता शुक्ल, अमीना तडवी, मीना जावळे, सरिता नेरकर यांसह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.

Protected Content