कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जळगाव जिल्हा दौरा

यावल -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्याच्या नियोजनाबाबत पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली.

यावल येथील शेतकी सहकारी खरेदी विक्री संघ येथे यावल तालुका काँग्रेस कमिटीची बैठक लोकप्रिय आमदार शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व तालुकाध्यक्ष जिप गटनेते अप्पासाहेब प्रभाकर सोनवणे यांचा प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे १० डिसेंबर या तारखेला जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असुन यावेळी आगामी काळात होवु घातलेत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, ग्राम पंचायतच्या सार्वत्रीक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पटोले यांचा हा अतिश्य महत्वाचा असुन , यावेळी नाना पटोले हे विविध विषयांवर तालुका व गाव निहाय बैठका घेऊन पक्षाच्या वतीने आढावा घेणार असून त्या संदर्भात नियोजन करण्याकरिता सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

सदर बैठकीला पंचायत समितीचे माजी सभापती लीलाधर चौधरी, बाजार समितीचे माजी सभापती नितीन चौधरी, प. स. गटनेते शेखर पाटील, कॉंग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष कदीर खान, जेष्ठनेते जावेद जनाब, फैजपूर शहराध्यक्ष रियाज भाई, नगरसेवक कलिम भाई, यावल नगर परिषदचे माजी गटनेता सय्यद युनूस, माजी नगरसेवक रसूल मेंबर, शेख असलम, समीर मोमीन, वढोदे सरपंच संदीप सोनवणे, मोमीन, मनोहर सोनवणे, समीर खान, खरेदी विक्री सहकारी संघाचे चेअरमन अमोल भिरुड, युवानेते धनंजय शिरीष चौधरी, अनिल पाटील, विठ्ठल सूर्यवंशी, अनिल जंजाळे, विवेक सोनार, फैजान शाह, सुनील फिरके, भाऊसाहेब, जिया सर, विक्की गजरे, उमेश जावळे, अशपाक शाह, जी.पी पाटील, इम्रान पहेलवान, उस्मान तडवी, प्रशांत पाटील, चंद्रकला इंगळे, विक्की पाटील, कलीमा तडवी, ससाणे सर, महेश राणे, विक्की सोनवणे, शेख सकलेन, सरफराज शाह यांच्यासह काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Protected Content