मोदींजी सत्यासाठी संघर्ष करणाऱ्यांना घाबरवले जाऊ शकत नाही : राहुल गांधी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मिस्टर मोदी यांना वाटते की सर्व जग त्यांच्यासारखं आहे. त्यांना असे वाटते की, प्रत्येकाची काही किंमत आहे किंवा प्रत्येकला घाबरवले जाऊ शकते. मात्र ते कधीही हे समजू शकणार नाही की सत्यासाठी जे संघर्ष करतात त्यांना घाबरवले जाऊ शकत नाही, अशा शब्दात राजीव गांधी फाऊंडेशनसह नेहरु-गांधी कुटुंबीयांशी संबधित तीन ट्रस्टच्या चौकशीसाठी केंद्र सरकारने समिती नेमल्यानंतर प्रतिउत्तर दिले आहे.

 

 

राजीव गांधी फाऊंडेशन, राजीव गाधी चॅरिटेबल ट्रस्ट या दोन्ही संस्थांच्या अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी काम पाहतात. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, राहुल गांधी हे या फाऊंडेशनचे सदस्य आहेत. शिवाय इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टचं कामही सोनिया गांधीच पाहतात. या तीनही संस्थांमध्ये मनी लॉंड्रिंग झालंय का? किंवा इन्कम टॅक्सचे घोटाळे झालेत का? विदेशी मदतीच्या नियमाचं उल्लंघन झालंय का? हे तपासून पाहिलं जाणार आहे. केंद्र सरकारनं प्रकरणाच्या चौकशीसाठी आंतर मंत्रालयीन समिती गठित केली आहे. ईडीचे संचालक या समितीचे प्रमुख असणार आहेत. याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले की, मिस्टर मोदी यांना वाटते की सर्व जग त्यांच्यासारखे आहे. त्यांना असे वाटते की, प्रत्येकाची काही किंमत आहे किंवा प्रत्येकला घाबरवले जाऊ शकते. मात्र ते कधीही हे समजू शकणार नाही की सत्यासाठी जे संघर्ष करतात त्यांना घाबरवले जाऊ शकत नाही.

Protected Content