केंद्र सरकार विरोधात व्हाटसअ‍ॅप न्यायालयात

नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्र सरकारने सोशल मीडियावर लादलेल्या निर्बंधांच्या विरोधात आज व्हाटसअ‍ॅपने न्यायालयात धाव घेतली आहे.

याबाबत वृत्त असे की, केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने २५ फेब्रुवारी, २०२१ रोजी सर्वच सोशल मिडिया कंपन्यांना नव्या नियमांचे पालन करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला होता. सोशल मीडिया कंपन्यांना भारतात, कंप्लायन्स अधिकारी आणि नोडल अधिकार्‍यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते आणि त्या सर्वांचे कार्यक्षेत्र भारतात असणे अनिवार्य केले होते. यात, तक्रार निवारण, आक्षेपार्ह कंटेंटवर लक्ष ठेवणे, कंप्लायंस रिपोर्ट आणि आक्षेपार्ह कंटेंट हटविणे आदी नियम यात आहेत.

केंद्र सरकारने दिलेली मुदत ही काल अर्थात २५ मे २०२१ रोजी संपली आहे. या पार्श्‍वभूविवर केंद्र सरकारच्या विरोधात व्हाटसअ‍ॅपने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. सरकारचा हा नवीन नियम युजर्सच्या प्रायव्हसीचा भंग करणार असल्याचा युक्तीवाद या याचिकेत करण्यात आला आहे. आता याचिकेवरील सुनावणीत नेमके काय होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content