Home Cities जळगाव सुजदे येथे चंद्रशेखर अत्तरदे यांचा झंझावाती प्रचार दौरा

सुजदे येथे चंद्रशेखर अत्तरदे यांचा झंझावाती प्रचार दौरा

0
135

attarde rally 1

जळगाव, प्रतिनिधी | शेतकऱ्यांच्या सर्वांगिण विकासाचा ध्यास घेवून उमेदवारी दाखल केलेले अपक्ष उमेदवार चंद्रशेखर प्रकाश अत्तरदे यांचा सुजदे येथे आज (दि.१७) सकाळी ११.०० वाजता झंझावाती प्रचार दौरा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी गावातील महिलांनी जागोजागी त्यांचे औक्षण करून स्वागत केले.

 

रॅलीत गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याचे दिसून आले. यावेळी भाजपा जळगाव तालुका अध्यक्ष संजय भोळे, मनोज चौधरी, दिलीप महाजन, दीपक चौधरी, गावातील सरपंच विलास चौधरी, ग्रा.पं. सदस्य, प्रमुख पदाधिकारी, ममुराबाद-आसोदा गटातील शक्ति प्रमुख नाना कोळी, सचिन चौधरी, कल्पेश, बूथ प्रमुख प्रवीण सोनवणे, मनोज सवदे, खगेश नेहेते, प्रतिसाद चिरमाडे, सागर चव्हाण, उमेश महाजन, तुषार भोळे, जीवन सोनवणे, मनीष चौधरी, सदाशिव कोळी, गणेश वानखेडे तसेच गटातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी आणि असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound