जामनेर पाचोरा रेल्वे चालू करण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन

जामनेर प्रतिनिधी | ‘जामनेर -पाचोरा नॅरोगेज रेल्वे केंद्र शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केली असून ते तात्काळ चालू करण्यात यावी. याबाबत जामनेर तहसील कार्यालयासमोर ‘रेल्वे बचाव कृती समिती’तर्फे सर्वपक्षीय सदस्यांनी एक दिवशीय धरणे आंदोलन करून तहसीलदार अरुण शेवाळे यांना लेखी निवेदन दिले

यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डी.के. पाटील, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष विलास राजपूत, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील, तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, शहराध्यक्ष पप्पू पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, प्रल्‍हाद बोरसे, अनिल बोहरा, शंकर राजपूत, संजय राठोड, राजू मोगरे, सचिन जाधव, सोनू सिंग राठोड, ईश्वर रोकडे, पवन माळी, अशोक पाटील, सुधाकर सपकाळे, राजू नाईक, संदीप पाटील, भगवान सोनवणे, विशाल पाटील, अतुल सोनवणे, श्रीराम पाटील, पंकज पाटील यांच्यासह शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी व सर्वपक्षीय पदाधिकारी या धरणे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘जामनेर पाचोरा नॅरोगेज रेल्वे’ बंद करण्यात आली होती मात्र आता ‘ब्रॉडगेज’ करीत असल्याचे सांगत शंभर वर्षांपूर्वीची जामनेर ची ओळख असलेली ‘नॅरोगेज रेल्वे’ आता केंद्र सरकार बंद करण्याच्या मार्गावर असून यामुळे सर्वसामान्य जनतेच्या फार मोठे नुकसान होणार आहे’ ”जामनेर’पासून छोटे मोठे खेडे. पहुर, शेंदुर्णी, पाचोरा या मार्गावरील शालेय विद्यार्थी असो मजूर शेतकरी यांच्यासाठी फायदेशीर असलेल्या ‘जामनेर पाचोरा नॅरोगेज रेल्वे’चा मोठा फायदा सर्वांना होतो. या नॅरोगेज रेल्वेला सर्वसामान्यांची नाळ जोडलेली आहे.

मात्र ही रेल्वे बंद असल्यामुळे गोरगरीब जनतेला मोठ्या प्रमाणावर जास्तीच्या आर्थिक भुर्दंड प्रवासात बसत आहे त्यामुळे जर केंद्राला या रेल्वेचाबद्दल ‘ब्रॉडगेज’मध्ये करायचा असेल तर आधी त्यांनी ‘ब्रॉडगेज’चं काम जामनेर ते बोदवड करावं व ‘नॅरोगेज’ रेल्वे सुद्धा चालू ठेवावी केंद्राने रेल्वे चालू केली नाही तर जामनेर तालुक्यात सर्व पक्षी यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा लेखी निवेदनाद्वारे सर्वपक्षीय धरणे आंदोलन कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आला आहे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content