‘आमची बांधिलकी जनतेशी’- शिवसेना प्रवक्ते ज्ञानेश्वर महाजन

shivasena

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील शिवसेनेचे दिवंगत लोकनेते स्व. पप्पू गुंजाळ यांच्या कृतज्ञता दिनानिमित्त शिवसैनिकांनी गुणगौरव व व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.

याबाबत माहिती अशी की, शिवसेनेच्या माध्यमातून शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी तथा शिवसैनिकांनी त्यांच्या प्रतिमेस आदरांजली वाहण्यात आली. 10 वी व 12वीच्या नुकताच निकाल लागला असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक निकाल पाहता गुणवंतांचा गौरव प्रमाणपत्र व शालेय साहित्य वाटप यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे प्रवक्ते ज्ञानेश्वर महाजन यांनी ‘आमची बांधिलकी जनतेशी’ या विषयावर शिवसेना हृदयात पोहोचणारी विचारधारा आहे. तसेच असंभाव्य माणसांची कार्य करण्यासाठी शिवसैनिक सर्वत्र दिसेल अशी स्वर्गीय बाळासाहेबांची शिवसेना व शिवसैनिक आहेत. यासाठी औरंगाबाद येथील राज्यकर निरीक्षक असलेले व एका वर्षात 17 पदे मिळवण्यात यशस्वी झालेले प्रमुख व्याख्याते अंकुर नखाते यांनी शालेय विद्यार्थी पुढील आव्हाने या विषयावर विद्यार्थी व पालकांनामधील आपापसातील नाते कसे जोपासावे व भविष्यातील वाटत कशाप्रकारे शोधावे यावर मार्गदर्शन केले.

तालुक्यातील पप्पूदादा गुंजाळ यांचा विचारधारेवर जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून त्यांनी लोकांची मने जोडलेले आहेत. म्हणून कर्मभूमी ते मातृभूमीच्या प्रवास आधारे चाळीसगावकरांची मने अल्पावधीत जिंकली. त्यांच्या नंतरही हे कार्य अविरतपणे चालू राहील. त्याच्‍यामागे आई वडिलांनी केलेल्या जडणघडण आणि समाजाचे घटक व काहीतरी देणे लागतो. हात केवळ उद्दिष्ट ठेवून मातृभूमीशी जोडण्याचे काम केले आहे. अशाच आत्मविश्वासने कोणाचे ही काम केल्याचे समाधान वाटते, असे मत उमेश गुंजाळ यांनी व्यक्त केले आहे. यावेळी तुकाराम कोळी, महेंद्र पाटील, रमेश चव्हाण, तालुकाप्रमुख भिमराव खलाने, विधानसभा क्षेत्र प्रमुख नंदू बाविस्कर, विजया पवार, सभापती नगर परिषद दिलीप घोरपडे, धर्मा काळे, रवी चौधरी, अमोल चौधरी, प्रफुल साळुंके, दादासाहेब मधले, प्रशिक कदम, अनिल राठोड, तुकाराम बागुल, संजय पठाणे, शैलेंद्र सातपुते, रामेश्वर चौधरी, पप्पू प्रेमी व शिवसैनिक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. थोरात पाचोरा यांनी तर रोहित जाधव यांनी आभार व्यक्त केले.

Protected Content