बीडीओंच्या आदेशाला सांगवी ग्रामपंचायतीने दाखवली केराची टोपली!

चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील सांगवी गावात तुडुंब गटारी भरलेल्या आहेत. याबाबत गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी ग्रामपंचायतीला आदेश दिला. मात्र ग्रामपंचायत बीडीओंच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असल्याचे प्रकार समोर आले आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील सांगवी गावात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असल्याने सांगवीत तुडुंब भरलेल्या गटारीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात या शिर्षकाखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्यावर चाळीसगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी लागलीच दखल घेऊन ग्रामपंचायतीला तातडीने सदर समस्या मार्गी लावण्याचे आदेश दिले. परंतु अद्यापही गावातील विदारक चित्र पहायला मिळत आहे. त्यावर गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ग्रामपंचायतीला कार्यवाही करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगून यावर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी २०२२-२३ च्या आराखड्यामध्ये काही उपाययोजना करता येतील का?    त्यावर विचार करण्यात येईल असे सांगितले. तत्पूर्वी पाच-सहा दिवस उलटूनही समस्यांचे निराकरण झालेले नसल्याने गटविकास अधिकाऱ्यांनाच ग्रामपंचायत केराची टोपली दाखवत असल्याचे प्रकार समोर आले आहे. त्यामुळे सांगवी गावातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात असल्याचे उघड झाले आहेत.

Protected Content