जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबई येथे पार पडली. राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत, जळगाव महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचा (MIDC) ‘D’ झोनमध्ये समावेश करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला राज्याचे पाणीपुरवठामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल पाटील, आमदार अमोल हरीभाऊ जावळे, आमदार राजूमामा भोळे यांच्या संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी, तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
जळगाव MIDC चा ‘D’ झोनमध्ये समावेश झाल्यास जिल्ह्याला औद्योगिक विकासासाठी अनेक नवीन संधी उपलब्ध होतील आणि मोठ्या गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीमुळे जळगावच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलले गेल्याचे मानले जात आहे.