जीवघेणा हल्ला करणाऱ्या वाळूमाफियांना तात्काळ अटक करा; कोतवाल संघटनेची मागणी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  बोदवड तालुक्यातील शेलवड येथील कर्तव्यावर कार्यरत असतांना कोतवाल यांच्यावर मंगळवारी १२ सप्टेंबर रोजी अवैध गौणखनिज माफीया यांच्याकडून झालेल्या जिवघेणा हल्ला व त्यांना ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकणातील आरोपीना तात्काळ अटक करून त्यांचेवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी असे निवेदन यावल तालुका कोतवाल संघटनेच्या वतीने यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना देण्यात आले आहे .

 

जळगांव जिल्हयात व महाराष्ट्रात मोठया प्रमाणात होत असलेल्या अवैधरित्या गौणखनिज उत्खन्नच्या वाहतुकीस आळा बसविणे कामी कोतवाल कर्मचारी नेहमी आपले कर्तव्य चोख पणे बजवित असतात,  अलीकडच्या काळात बामणोद मंडळ अधिकारी श्रीमती बबीता सुधाकर चौधरी, व रावेर परिविक्षाधीन तहसिलदार यांचेवर गौणखनिज माफीयाच्या माध्यमातुन हल्ले करण्यात आली. दुसरीकडे १२ सप्टेंबर रोजी बोदवड तालुक्याचे तहसिलदार यांनी अवैध गौणखनिज वाहतुक करणारे ट्रॅक्टर हे पकडुन शेलवड तालुका बोदवड येथील कोतवाल गजानन सुभाष अहिरे यांचे ताब्यात देऊन सदरचे वाहन बोदवड तहसिल कार्यालयात पुढील कार्यवाही करीता जमा करणे बाबत सुचना दिल्यात. त्यानंतर  तहसिलदार हे पुढील कार्यवाही करीता रवाना झाले त्यानंतर कोतवाल  गजानन अहिरे आपले कर्तव्य चोखपणे बजवीत असतांना सदर अवैध गौणखनिज वाहतुक करणारे ट्रक्टर मालक,चालक व इतर काही जणांनी कोतवाल गजानन सुभाष अहिरे यांच्यावर जिवघेणा हल्ला केला व त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन ट्रक्टरसह पसार झाले. या संदर्भात आरोपी विरुध्द बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

 

तरी या गुन्ह्यातील हल्लेखोरांना तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदनावर कोतवाल संघटनेचे यावल तालुकाध्यक्ष विशाल राजपूत उपाध्यक्ष जयश्री कोळी, सचिव ओंकार सपकाळे, प्रशांत सरोदे, सागर तायडे, धनराज महाजन, विजय आढाळे, निलेश गायकवाड, सोनूसिंग राजपूत, सागर साळवे , विकास सोळंके आदींच्या स्वाक्षरी आहे.

Protected Content