पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडीया या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी

यावल, प्रतिनिधी | पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या देश विघातक संघटनेवर देशात बंदी घालण्यात यावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने निवेदनाद्वारे केली आहे.

केरळ राज्यात सन: २००६ मध्ये स्थापन झालेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या संघटनेचे जाळे आता देशभरात पसरले आहे. ही संघटना अत्यंत जहाल असून अनेक देशविघातक आणि समाजविघातक कार्यात गुंतलेली असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. ही संघटना देशातील धार्मिक सलोखा आणि सामाजिक शांतता यांसाठी अत्यंत धोकादायक आहे. यामुळे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर देशात बंदी घालण्यात यावी अशी हिंदू जनजागृती समितीने निवेदनाद्वारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच नायब तहसीलदार आर. डी. पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान निवेदनात जून २o११मध्ये ‘कर्नाटक फोरम फॉर डिग्निटी’ अर्थात ‘के.एफ.डी.’च्या सदस्यांनी म्हैसूरमधील एस्.बी.आर्.आर्.महाजन महाविद्यालय परिसरातून दोन मुलांचे अपहरण करून त्यांची हत्या केली. ‘के.एफ.डी.’साठी निधी उभारण्यासाठी  पाच कोटी रुपयांची खंडणी त्यांनी मागितली होती. यासंदर्भात तत्कालीन कर्नाटक राज्य सरकारने केंद्र सरकारला ‘कर्नाटक फोरम फॉर डिग्निटी’वर बंदी घालण्याची विनंती केली होती. हीच ‘केडीएफ’ नंतर ‘पीएफआय’मध्ये विलीन झाली. वर्ष २०१२ मध्ये केरळ शासनाने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’विषयी केरळ उच्च न्यायालयाला माहिती देतांना सांगितले होते की, ही संघटना देशाच्या सुरक्षितेच्या दृष्टीन घातक असून ‘स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ अर्थात ‘सिमी’ चे पुनरुज्जीवन करण्याचा प्रकार आहे.’सिमी’वर केंद्रशासनाने देशद्रोही कृत करण्यात सहभाग घेणारी संघटना म्हणून बंदी घातलेली आहे.  यांसह अपहरण करणे, दंगली घडवणे आर्ग’ अमक देशविघातक कारवायांमध्ये समावेश असल्याचे निवेदनात म्हटले आहे .या निवेदनामध्ये आपणास लिखाणाची मर्यादा असल्याने अधिक तपशील देणे उचित होणार नाही. अ.’पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ आणि तिच्याशी संबंधित सर्व संलग्न संघटनांवर तत्काळ बंदी आणावी व देशाची सुरक्षितता आणि धार्मिक सलोखा टिकवण्यासाठी आपण आमच्या मागण्या अवश्य गांभीर्याने घ्याल, अशी आम्हाला खात्री आहे. आपल्याकडून झालेल्या कार्यवाही विषयी कृपया आम्हाला अवगत करावे, ही विनंती,जळगाव जिल्हा व यावल तालुका हिंदू जनजागृती समितीतर्फे प्रशांत जुवेकर, धिरज भोळे, यांनी केली आहे.

Protected Content