ब्रेकींग न्यूज : मुकेश सपकाळे खून प्रकरणात एकाला जन्मठेप !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुचाकीला मागून दुसऱ्या दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून भावाचे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या मुकेश मधुकर सपकाळे रा. आसोदा जि.जळगाव या तरूणाच्या चाकू भोसकून निर्घृण खून प्रकरणात किरण अशोक हटकर (वय-२४, रा. नेहरू नगर, जळगाव) याला जळगाव जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा बुधवारी १३ सप्टेंबर रोजी दुपारी न्यायमुर्ती बी.एस. वावरे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, २९ जून २०१९ रोजी रोहित मधुकर सपकाळे रा. आसोदा ता.जि.जळगाव हा मु.जे.महाविद्यालयाच्या पार्कींग झोनमध्ये आला होता. त्यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकीने अचानक ब्रेक मारल्याने रोहितच्या दुचाकीला धक्का लागला. या कारणावरून रोहितशी तीन जणांनी वाद घातला. त्यानंतर त्याच महाविद्यालयात रोहितचा भाऊ मुकेश मधुकर सपकाळे याला बोलावले. त्यानंतर मुकेश सपकाळे तिथे आला व भांडण सोडविण्याचा प्रयत्न करत असतांना तिघांनी दोन्ही भावांना मारहाण करण्यास सुरूवात केली. यात किरण अशोक हटकर याने मुकेशच्या डोक्यावर व छातीवर चाकूने वार केले व त्यातच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरण रामानंद नगर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यापासून संशयित आरोपी फरार झाले होते. पोलीसांनी त्यांना पुण्यातून अटक केली होती. या गुन्ह्यात इच्छाराम पुंडलिक वाघोदे (२४, रा. समतानगर), किरण अशोक हटकर (२४, रा. नेहरुनगर, जळगाव), अरुण बळीराम सोनवणे (२७, रा. समतानगर), मयूर अशोक माळी (२२), समीर शरद सोनार (२४, रा. फॉरेस्ट कॉलनी), तुषार प्रदीप नारखेडे (२३, रा. यशवंत नगर) अशी सहा जणांची नावे निष्पन्न झाले.

 

जाणून घ्या… मुकेशच्या मारेकऱ्यांचा अटकेचा थरार

हा खटला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायमुर्ती बी.एस.वावरे यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. यात एकुण ३० साक्षिदार तपासण्यात आले. यात मयताचा भाऊ रोहित सपकाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश देवराज, पंच यांची साक्ष महत्वाची ठरली. न्यायालयाने साक्ष व पुराव्याअंती मुख्य आरोपी किरण हटकर याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तर इतर पाच जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी प्रभावी युक्तीवाद केला. त्यांना पैरवी अधिकारी तुषार मिस्तरी, नरेंद्र मोरे यांनी सहकार्य केले. आरोपींतर्फे ॲड. प्रकाश बी. पाटील यांनी काम पाहिले.

 

पहा : या धक्कादायक घटनाक्रमाचा व्हिडीओ

मुकेश सपकाळे खून प्रकरण : पाच संशयितांना चार दिवसाची पोलीस कोठडी

मुकेश सपकाळे खून प्रकरण : पाच आरोपींना पुण्यातून अटक

मुकेश सपकाळे खून प्रकरणातील संशयित आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

Protected Content