अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; अज्ञात ५ जणांवर शनीपेठेत गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील जुना नशिराबाद रोड नजीक राहणाऱ्या १५ वषीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील जुना नशिराबाद रोड परीसरात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या विधवा आई, आजी, मोठी बहीण व भावासोबत राहते. अल्पवयीन मुलगी हा टिकटॉकवर व्हिडीओ तयार करत असते. २७ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास सर्वजण जेवण करून घराच्या बाहेर असलेल्या ओट्यावर सर्वजण बसले होते. त्यावेळी एका कार त्यांच्या घरासमोर थांबली. कारमध्ये चार मुले आणि एक महिला बसलेले होते. यातील दोन मुले आणि अल्पवयीन मुलीशी गप्पा करत होते. अल्पवयीन मुलीची आईसह सर्वजण पुन्हा घरात गेले. त्यानंतर अल्पवयीन मुलगी दिसून आली नाही. नातेवाईकांनी शोधाशोध केली असता मिळून आली नाही. दरम्यान चार मुली आणि एक महिलेने फुस लावून पळवून नेल्याचे लक्षात आले. घटना घडताच अल्पवयीन मुलीची आईने शनीपेठे धाव घेतली आहे. याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरून अज्ञात चार मुले आणि एक महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मनोज इंद्रेकर करीत आहे.

Protected Content