निंभोरासिम येथे अवैध वाळू साठा ; दोन ट्रॉली जप्त

रावेर प्रतिनिधी । निंभोरासिम येथून वाळू साठ्यावरुन अवैध वाळू भरत असतांना गावातील पोलिस पाटील यांनी दोन ट्रॉली जप्त करून रावेर तहसील कार्यालयात आणले आहे. त्यामुळे निंभोरासिम परीसरात वाळूचे अवैध साठे केले जात असून याकडे तहसीलदारांचे दुर्लक्ष होत आहे.

महसूल सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील निंभोरासिम येथे वाळूचे मोठे साठे तयार केले जात असून येथून वाळू ट्रॉलीत भरत असतांना गावातील स्थानिक पोलिस पाटलांनी निळ्या रंगाच्या दोन ट्रॉली जप्त केले आहे. या ट्रॉलीला कोतवाल गणेश चौधरी यांनी ट्रक्टर लावुन चालवत तहसिल कार्यलायत जमा केले आहे. निंभोरासिम परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूक केली जाते. याकडे स्थानिक महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यापूर्वी देखिल निंभोरासिम येथून निष्काळजी पणामुळे महसूलने जप्त केलेली सुमारे चारशे ब्रास अवैध वाळू चोरीला गेली होती. यामुळे महसूल प्रशासनाला लाखो रूपयांचा चुना लागला होता. आज पुन्हा वाळूच्या साठ्यावरुन बेवारस ट्रॉली जप्त होत आहे. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात अवैध वाळुची तस्करी केली जाते. वाळुचे साठे जमा केले जातात याकडे तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी लक्ष देण्याची मागणी जनतेतुन होत आहे.

 

Protected Content