जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ अण्णासाहेब जी डी बेंडाळे महिला महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन ‘जल्लोष-22-23’च उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या ऍड ललिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी लेवा एज्युकेशनल युनियन या संस्थेचे संचालक श्री. किरण बेंडाळे, श्री उल्हास निंबा चौधरी, प्रा. व. पु. होले, प्रा. एल. व्ही. बोरोले, प्राचार्य डॉ. गौरी राणे, उपप्राचार्य प्रा. व्ही . जे. पाटील, उपप्राचार्य डॉ. पी. एन. तायडे, उपप्राचार्य सौ. एस. बी. पाटील, स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. रत्नप्रभा महाजन, कला मंडळ प्रमुख डॉ. सत्यजित साळवे, विद्यार्थिनी प्रतिनिधी उपस्थित होते.
या संमेलनाच्या उदघाटक सामाजिक कार्यकर्त्या ऍड ललिता पाटील यांनी विद्यर्थिनींना मार्गदर्शन करतांना सांगितलं की सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, अहिल्यादेवी होळकर, यांना वाचा आणि त्यांच्या जीवनातील एखादा तरी चांगला गुण आपल्या जीवनात आत्मसात करा. सावित्रीबाई फुलेंना वाचून त्यांच्यातील एक गुण जरी आपण आत्मसात केला तर एकही निर्भया होणार नाही, असा आत्मविश्वास आपल्या मनोगत आतून ललिता पाटील यांनी विद्यार्थिनींना दिला.
यावेळी संस्थेचे संचालक किरण बेंडाळे यांनी व्यक्तिमत्व विकास होणे हा या स्नेहसंमेलनाचा उद्देश असल्याचे सांगत; निरोगी शरीर, निरोगी मन, सकारात्मक विचार, ध्यानधारणा, बुद्धिमत्ता यांना आपला आयुष्यात महत्त्व असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले .याप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाची आदर्श विद्यार्थिनी दीप्ती कमलाकर पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाची देवयानी नाईक, तसेच स्नेहसंमेलन सचिव खुशी दीपककुमार गुप्ता व रिया ठाकूर यांना उपस्थित मान्यवर संचालकांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
आज स्नेहसंमेलनाची सुरुवात ‘फूड फेस्टिवल’ ने करण्यात आली. या फेस्टिवलचे संचालन प्रा. सौ. नंदा बेंडाळे यांनी केले. त्यानंतर “प्रश्नमंजुषा स्पर्धा” विद्यार्थिनींना दोन गटात विभागून घेण्यात आली, सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न उत्तरे, संगीत, बझर अशा तीन फेऱ्यातून विद्यार्थिनींनी यामध्ये नैपुण्य दाखवले. या स्पर्धेचे आयोजन व संचालन डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी केले. दुपारच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनाने प्रारंभ करण्यात आली त्यानंतर सोलो डान्स, गीत गायन, ग्रुप डान्स, पोवाडा यासारखे कलागुण विद्यार्थिनी सादर केले.
या संमेलनाच्या उदघाटन समारंभाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.गौरी राणे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सत्यजित साळवे यांनी केले तर आभार विद्यार्थिनी प्रतिनिधी रिया ठाकूर हिने केले.
स्नेहसंमेलनाच्या उत्तरार्धात उद्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व रविवारी सायंकाळी फॅशन-शो चे आयोजन करण्यात आले आहे.