ठाणे – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । मुसलमानांनी घरात प्रार्थना करावी. सण, उत्सवाच्या वेळी दहा, पंधरा दिवस समजू शकतो मात्र ३६५ दिवस मशिदीवर असलेल्या भोंग्यांचा सर्वसामन्यांना त्रास होतो असे म्हणत 3 मे पर्यंत भोंगे काढले नाहीत तर देशभर मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्यात येणार असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे. .
गुढीपाडवा मेळाव्यात नंतर अवघ्या दहा दिवसांत राज ठाकरे यांची ठाण्यात आज दुसरी सभा झाली. गडकरी रंगायतनसमोरील डॉ. मूस रोड येथे संपन्न झालेल्या या सभेतराज ठाकरे यांनी संवाद साधला.
यात बोलतांना त्यांनी, ‘भोंग्यांचा आवाज हा बेसूरा असल्याचे सांगत त्यामुळे शांतता बिघडते असं म्हणत इतरांची शांती बिघडवून तुम्ही तुमचा भोंगे वाजवून प्रार्थना करा असा कोणताही धर्म सांगत नाही. इतरांची शांती भंग होईल अशा कोणत्याही गोष्टीला परवानगी देण्यात येणार नाही असं दि.१८ जुलै २००५ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका सुनावणीत सांगितलं आहे मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाची राज्यातील गृहखातं अंमलबजावणी का करत नाही असा सवाल राज ठाकरेंनी यांनी केला आहे. आता 3 तारखेपर्यंत ऐकला नाही तर देशभरातील मशिदींच्यासमोर हनुमान चालीसा हनुमान चालीसा लावण्यात येईल असे ठाकरे यांनी सांगितले.