थकबाकीदारांसाठी अभय योजना — आयुक्त कुलकर्णी (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील थकबाकीदार मिळकतधारकांसाठी महापालिकेतर्फे ७ जानेवारी पासून अभय योजना लागू करण्यात येणार असून अशा थकबाकीदार मिळकतधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त सतीश कुळकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केले.

आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी पुढे सांगितले की, अभय योजनेत भरणा ऑनलाईन पद्धतीने तसेच ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहे. या योजनेचा लाभ न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणात मिळणार नाही. तसेच ज्या गाळेधारकांची मुदत संपलेली नाही अशा गाळेधारकांना या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. मात्र, मुदत संपलेल्या गाळेधारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ न घेल्यास २४ टक्के शास्ती न घेता प्रत्येक महिन्यासाठी २ टक्के इतकी शास्ती आकारली जाणार आहे. यानुसार पुढील वर्षाचे २०२१-२२ या आर्थिक वर्षात २४ टक्केचे वाढीव शास्ती भरावी लागणार आहे.

अशी आहे अभय योजना
७ ते ३१ जानेवारी २०२१ पर्यंत भरणा केल्यास शास्तीत (दंड) ७५ टक्के सुट मिळणार आहे.
१ ते १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत भरणा केल्यास शास्तीत (दंड) ५० टक्के सुट मिळणार आहे.
१६ ते २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत भरणा केल्यास शास्तीत (दंड) २५ टक्के सुट मिळणार आहे.

शहरातील घरपट्टी आकारणी सर्व्ह पूर्ण त्रेस्थत यंत्रणेकडून सर्व्हे करण्यात आला आहे. यानुसार फेर मूल्यांकन करण्यात येणार आहे. मात्र, करात कोणतीही वाढ करण्यात येणार नाही. नवीन आकारणी बाबत नोटीस देणे, हरकती मागविणे, सुनावणी घेणे हे सर्व ३१ मार्च करण्यात येणार आहे.

अमृत योजना नवीन लाईनवर मनपा खर्चातून शिफ्ट करणार

शहरात अमृत योजनेंतर्गत टाकण्यात आलेल्या पाईप लाईनवरून नळ कनेक्शन देण्यात येणार आहे. हे कनेक्शन मनपा स्व-खर्चाने करणार आहे. अपार्टमेंटला नळ कनेक्शन देतांना तांत्रिक अडचण निर्माण होणार असल्याने प्रत्येक अपार्टमेंटला एकच कनेक्शन त्याच्या क्षमतेच्या मागणीनुसार देण्यात येणार आहे. या अपार्टमेंटधारकांना पाणीबिल एकत्र भरावे लागेल.

https://www.facebook.com/508992935887325/videos/461422504885350

Protected Content