अहिरे बुद्रुक ग्रामपंचायतीचे दोन उमेदवारांची बिनविरोध निवड

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील अहिरे बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या सात जागांपैकी दोन जागा बिनविरोध निवडून आल्या आहे. महाविकास आघाडीचे विजय पाटील आणि वैशाली पाटील या दोघांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील अहिरे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी निवडणूक घेण्यात येत आहे. गावातील वार्ड क्रमांक २ मधील महाविकास आघाडीचे दोन उमेदवार आज बिनविरोध निवडून आले आहे. यात विजय शरद पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि वैशाली पवन पाटील (शिवसेना) यांची निवड आज बिनविरोध झाली आहे. निवड झालेल्या दोन्ही सदस्यांचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून अभिनंदन होत आहे.

Protected Content