आज बाळासाहेब असते तर राऊतांच्या थोबाडीत मारली असती ! : चंद्रकांत पाटील

मुंबई प्रतिनिधी | संजय राऊत यांची सध्याची वक्तव्ये पाहता आज स्व. बाळासाहेब जीवंत असते तर त्यांनी राऊतांच्या थोबाडीत मारली असती, अशा शेलक्या शब्दांमध्ये आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीकास्त्र सोडले आहे.

याबाबत वृत्त असे की, त्रिपुरातील हिंसेचे राज्यात पडसाद उमटले असून भाजप नेत्यांनी यासाठी महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धरले आहे. यातही विशेष करून या हिंसाचारावर संजय राऊत यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कडाडून टीका केली आहे. याबाबत ते म्हणाले की, त्रिपुरात मस्जिद पाडल्यानंतर त्याचे पडसाद मालेगावमध्ये उमटले, यापेक्षा मला संजय राऊतांचे वक्तव्य ऐकून खूप कीव येत आहे. राजकारणासाठी किती लाचार झालेत, हे दिसतेय. आज स्व बाळासाहेब जिवंत असते तर एक थोबाडीत मारली असती.

पाटील पुढे म्हणाले की, मालेगाव, अमरावती आणि नांदेडमध्ये अस्वस्थता निर्माण करण्याच्या प्रकारावर शिवसेनेने पूर्वी सारखी टीका करावी, मुस्लिम मतांची काळजी करू नका, ५ टक्के मुस्लिम गडबड करतो, त्यावर तुम्ही टीका पण नाही का करणार? असा सवाल पाटलांनी उपस्थित केला आहे.  तर, संजय राऊत यांनी  राज्यसरकारने  डिझेल, पेट्रोलचा वॅट कमी करावा यासाठी आंदोलन करावे, अशी प्रतिक्रिया त्यांनी राऊतांच्या औरंगबादच्या आंदोलनावर दिली आहे.

Protected Content