मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री शिवसेनेचाच व्हावा अशी महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे. त्यामुळे शिवसेनेने ठरवले तर आवश्यक ते बहुमत सिद्ध करू शकतो, असे सूचक वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. आज (शुक्रवार) सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एवढेच नव्हे तर, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.
या पत्रकार परिषदेत भाजपने चर्चेसाठी 8 दिवस का लावले? असा सवाल राऊत यांनी केला आहे. कार्यकर्ते, नेते. राजा व्यापारी नसल्याचे सांगत राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. दुसरीकडे संयज राऊत यांनी गुरुवारी शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर समीकरणे बदलणार का अशी चर्चा सुरु होती. मात्र ही भेट कोणत्याही राजकीय हेतूसाठी घेतली नसल्याचे राऊत यावेळी म्हणाले होते. दुसरीकडे राष्ट्रवादीनंतर कॉंग्रेस देखील शिवसेनेला पाठींबा देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर आहे. याच संदर्भात कॉंग्रेस नेत्यांचे एक शिष्टमंडळ आज सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याची माहितीदेखील समोर आली आहे.