जळगावात जागतिक मातृ दिनानिमित्त आदर्श मातांचा सत्कार

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जागतिक मातृदिनानिमित्त ‘भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव’तर्फे आपल्या प्रथितयश मुलांच्या शिल्पकार असूनही श्रेय न घेणाऱ्या सदाचारी जीवनमूल्यांची पेरणी करणाऱ्या आदर्श मातांचा सत्कार करण्यात आला.

‘भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव’तर्फे दिनांक ८ ते १० मे २०२२  कालावधीत ‘जागतिक मातृदिना’निमित्त आपल्या प्रथितयश मुलांच्या शिल्पकार असूनही श्रेय न घेणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीत अविचल निष्ठा, त्याग, समर्पण व सदाचारी जीवनमूल्यांनी आमरण आचरण करणाऱ्या व्रतस्थ आदर्श मातांचा सत्कार अनपेक्षितपणे त्यांच्या निवासस्थानी जाऊन करण्यात आला.

सत्काराचे स्वरूप व सन्मानार्थी माता : –

सुमती अनिल महाजन दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्र संचालक यजुर्वेंद्र महाजन यांच्या मातोश्री यांचा सत्कार निवृत्त प्राध्यापक दिलीप चौधरी शुभहस्ते करण्यात आला.

जळगाव जनता बँक संचालिका सावित्री रवींद्र सोळुंके यांचा सत्कार श्रद्धा ऋषी सोळुंके यांच्या हस्ते, दिप्ती पुंडलिक किनगे यांचा सत्कार उल्का चौधरी व योगशिक्षिका सौ.वर्षा किनगे यांच्या हस्ते. सिंधू सुपडू सुतार यांचा सत्कार सावरकर मित्रमेळाचे संस्थापक संजय भावसार यांच्या हस्ते, इंदूबाई शांताराम बडगुजर यांचा सत्कार भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगावचे अध्यक्ष विजय लुल्हे यांच्या हस्ते, सरला मनोहर खोंडे यांचा सत्कार वर्षा जगदीश बोरसे, तुषार खोंडे आणि राधा खोंडे यांच्या हस्ते करण्यात आला.

‘मातृसन्मान सोहळा सत्कार करणारांनाही कर्तृत्वाची जाणीव आणि मूल्याधिष्ठीत पारंपारिक संस्कारांची दिक्षा देतो’ असे प्रतिपादन याप्रसंगी उल्का चौधरी यांनी केले. तर आदर्श मातांचा सत्कार समाजाला दिपस्तंभासमान असतो असे म्हणत हा उपक्रम समाजाने चळवळ म्हणून उत्स्फूर्तपणे राबवावा अशी अपेक्षा प्रा.दिलीप चौधरी यांनी याप्रसंगी व्यक्त केली.   

“कौटुंबिक सौख्याचा पाया व सेवा समर्पणाचा कळस कुटूंब संस्थेसाठी करणाऱ्या चंदनाप्रती झिजणाऱ्या मातांचा सन्मान सोहळा औषधोपचारांपेक्षा महत्वाचा असल्याने निश्चितच दिर्घायुष्य व मानसिक आरोग्य देणारा ठरेल.” असे मनोगत सत्कारार्थी दिप्ती किनगे यांनी व्यक्त केले.

मातृसन्मान सोहळ्याची प्रेरणा निवृत्त डी.एड प्राचार्य नीळकंठ गायकवाड, निवृत्त प्राथमिक विभाग शिक्षण उपसंचालक साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर, निवृत्त माध्यामिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर यांनी दिली.

कार्यक्रमास दिपस्तंभ स्पर्धा परिक्षा केंद्राचे संचालक यजुर्वेंद्र महाजन, संयोजक तथा भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी संस्थापक जिल्हा प्रमुख विजय लुल्हे, जगदीश महाजन, ह.भ.प.मनोहर खोंडे, देवकाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष चित्रकार सुनिल दाभाडे, राजकुमार गवळी, मनोबल दिव्यांग केंद्राचे व्यवस्थापक आर.डि.पाटील, वसतीगृह व्यवस्थापिका विद्या भालेराव, लेवा डान्स आयकॉन पुरस्कृत दिव्यांग नृत्यांगना मानसी पाटील, अँडमिन सम्राट माळवदकर, संगणक प्रशिक्षक श्याम मिश्रा, सेवक पंकज गिरासे , रवि आर्ट क्लासेसचे संचालक ऋषी सोळुंके, ऋतिका कोळी, रिद्धी सोळुंके, पुंडलिक किनगे, सिंधु सुतार, सुवर्णा लुल्हे, सुरेखा बडगुजर, समिक्षा लुल्हे, सुदाम बडगुजर आदी. मान्यवर उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!