धरणगाव : ईब्राहीम हाजी शेख यांची बंडखोरी कुणाच्या पथ्थ्यावर ?

ebrahim haji shaikh

धरणगाव, प्रतिनिधी | येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठीच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार ईब्राहीम अब्दुल रसूल हाजी शेख निवडणूक रिंगणात उतरले आहेत. माजी नगरसेवक असलेल्या आणि मुस्लीम भागात चांगला जनसंपर्क असलेल्या ईब्राहीम हाजी शेख यांची उमेदवारी शहरात लक्षवेधी ठरली आहे. त्यांची ही बंडखोरी शिवसेना उमेदवाराच्या पथ्थ्यावर पडणार असल्याची जोरदार चर्चा सध्या शहरात आहे.

 

दिवंगत नगराध्यक्ष सलीम पटेल हे मुस्लीम समाजाचे होते पण ते शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते होते. त्यांची हिंदू मतदारांमध्येही तेवढीच लोकप्रियता होती. पण मुस्लीम मतदार हे परंपरेने काँग्रेसी विचारसरणीच्या पक्षांशी जुळलेले असतात, अशावेळी सलिम पटेल यांना दोन्ही समाजांचा जसा पाठींबा होता, तसाच आताच्या कुठल्याही उमेदवाराला मिळण्याची शक्यता कमीच दिसून येते. अशा परिस्थितीत मुस्लीम मते राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराकडे वळली तर शिवसेनेचे गणित बिघडणे शक्य होते. पण आता ईब्राहीम हाजी शेख यांच्या रूपाने तगडा मुस्लीम उमेदवार मैदानात उरला असल्याने ही मते विभागली जावून त्यांना मिळणारी मते राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून कमी होणार आहेत. त्यामुळे या परिस्थितीचा अप्रत्यक्ष लाभ शिवसेनेला होईल. अशीही चर्चा आज शहरात होती.

Protected Content