“होणाऱ्या मनस्तापामुळे मला आत्महत्या करावी वाटतेय” – तुकाराम सुपे

पुणे वृत्तसंस्था | टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा निलंबित आयुक्त तुकाराम सुपे यांना या प्रकरणात गोवलं जात असल्याचे सांगत होणाऱ्या मनस्तापामुळे सुपे यांच्या मनात आत्महत्येचे विचार येत असल्याचे त्यांचे वकील मिलिंद पवार यांनी मिडीया प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

हा घोटाळा उघड झाल्यापासून सुपे तणावात असल्याचे सांगत ‘2017 मध्ये ज्या कंपन्या काम दिलं होतं याच कंपन्या काम करत होत्या मला मात्र यात टार्गेट केलं जात आहे’ असल्याची प्रतिक्रिया सुपे यांनी दिल्याची माहिती अॅड. मिलिंट पवार यांनी दिली.

टीईटी परीक्षेत गैरव्यवहार झाल्याप्रकरणी तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकर याच्य्यासह अन्य साथीदारांवर आरोप झालेले आहेत. दरम्यान तुकाराम सुपे याच्या कार्यालयासह परिचितांकडे धाडी टाकून सोने आणि चांदी सह 3 कोटी 87 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Protected Content