अँटिगा प्रतिनिधी । वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत जेव्हा अजिंक्य रहाणे फलंदाजीसाठी आला होता. तेव्हा भारताची धावसंख्या ३ बाद २५ होती. संकटात असलेल्या टीमला अजिंक्यने ८१ धावांच्या दमदार खेळीने सावरले. नुकताच रहाणे एका पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘मी फक्त टिमचाच विचार करतो’.
याबाबत माहिती अशी की, दिवसभराचा खेळ संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रहाणे म्हणाला, ‘मला वाटतं या विकेटवर ८१ धावांचा खेळही खूप होता. आणि आता आम्ही या कसोटीत चांगल्या स्थितीत आहोत. मी जेव्हा मैदानात असतो. तेव्हा फक्त टीमचाच विचार करतो, मी स्वार्थी नाही. त्यामुळे मला शतक हुकल्याचं दु:ख नाही. रहाणे पुढे म्हणाला, ‘टीमसाठी केलेलं योगदान जास्त महत्त्वाचं ठरतं. मी माझ्या शतकाबद्दल विचार करत होतो. पण त्याची मला फार चिंता नव्हतो. परिस्थितीनुसार खेळणं अधिक महत्त्वाचं होतं’. रहाणेने यापूर्वीचं शतक २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध बनवले होते.