जिल्हा संघाची निवड चाचणी लवकरच होणार- अध्यक्ष फारूक शेख

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशन संघटनेची महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेने मान्यता मिळाली आहे. संघटनेचे विविध गटातील स्पर्धेचे आयोजनाबाबत परिपत्र प्राप्त झाले आहे. फेब्रुवारी महिन्यात निवड चाचणी स्पर्धा होणयासाठी नूतन मराठा महाविद्यालयात संघटनेचे व्हॉलीबॉल क्रीडांगण सुरू करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष फारूख शेख यांनी दिली.

पासिंग व्हॉलीबॉल असो. जिल्हा जळगाव चे अध्यक्ष फारुक शेख , उपाध्यक्ष श्रीमती मंजुषा भिडे , सचिव अंजली पाटील, विनोद पाटील, मिलिंद काळे , इफतेखार अहमद शेख, दर्शन आटोळे, जाहेद शेख , भाऊसाहेब पाटील, बास्केटबॉल प्रशिक्षक वाल्मीक पाटील व सोमेश आटोळे यांचे सह २५ ते ३० व्हॉलीबॉल खेळाडू उपस्थितीत होते.

नूतन मराठा महाविद्यालय येथील मुख्य पटांगणात नव्याने तयार करण्यात आलेल्या व्हॉलीबॉल मैदानाची पूजा करून खेळ सुरू करण्यात आला. या वेळी संघटनेची बैठक घेऊन पुढील काळात स्पर्धा व दैनंदिन सराव बाबत चर्चा करून जास्तीत जास्त मुले व मुली खेळाडू तयार व्हावेत, व्हॉलीबॉल खेळाचा प्रसार व प्रचार व्हावा या उद्देशाने देखील चर्चा करण्यात आली. नूतन मराठा महाविद्यालय  संस्थेचे, प्राचार्य डॉ एल पी देशमुख व त्यांचे सर्व सहकारी यांचे आभार व्यक्त केले.

Protected Content