एकलव्य क्रीडा संकुलात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  मेजर ध्यानचंदसिंग यांच्या जयंतीनिमित्त एकलव्य क्रीडा संकुल, जळगांव येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून एकलव्य क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात एकलव्य क्रीडा संकुलातील प्रशिक्षक तसेच राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर दैदीप्यमान कामगिरी करणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ॲड. प्रमोद पाटील, सचिव, केसीई सोसायटी, जळगाव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन एकलव्य जिम्नॅस्टिक्स विभागाचे मुख्य प्रशिक्षक प्रा. डॉ. निलेश जोशी सर यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी मांडले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून  शिल्पा पाटील, पोलीस निरीक्षक, रामानंद नगर, जळगाव,  गुरुदत्त चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव,  राजेश जाधव, सचिव, जळगाव जिल्हा अॅथलेटिक्स संघटना, ॲड. प्रमोद पाटील, सचिव, केसीई सोसायटी, जळगाव, प्राचार्य डॉ. अशोक राणे, केसीई सोसायटीचे शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव, प्रा. संदीप केदार, जनसंपर्क अधिकारी केसीई सोसायटी, जळगाव, डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक, मू. जे. महाविद्यालय, जळगाव आणि डॉ. रणजीत पाटील उपस्थित होते.

या दिवसाचे औचित्य साधून प्राध्यापक डॉ. निलेश दिपकराव जोशी यांच्या “ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीयांची यशोगाथा” या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्रीमती शिल्पा पाटील, पोलीस निरीक्षक, रामानंद नगर, जळगाव, गुरुदत्त चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव व डॉ. प्रमोद पाटील, सचिव, केसीई सोसायटी, जळगाव यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले व उपस्थित खेळाडू विद्यार्थ्यांना पुढील वाटचालींसाठी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रम प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता एकलव्य क्रीडा संकुलातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content