मी मतांची भीक मागतो, मात्र बोगस कामे करत नाही : उध्दव ठाकरे

अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मी मतांची भीक मागत असलो तरी बोगस कामे करत नाही असे म्हणत माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील सत्ताधार्‍यांवर कडाडून प्रहार केले.

उध्दव ठाकरे यांनी आज अमरावतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधार्‍यांवर जोरदार प्रहार केले. ते म्हणाले की, देशाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आणीबाणीनंतर जनता पक्षाला प्रचाराची मुभा तरी होती. साहित्यिक रस्त्यावर उतरले होते. आज तेवढीही मुभा राहिली नाही. तसेच , मुख्यमंत्री व्हायचं माझं कधीच स्वप्न नव्हतं. अनपेक्षितपणे मी मुख्यमंत्री झालो. शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचाच असं वचन मी वडिलांना दिलं होतं. मी अमित शाह यांना तसं सांगितलं होतं. त्यामुळेच अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला. बरं मी झालो पंतप्रधान काय फरक पडणार आहे? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टिकेला देखील त्यांनी उत्तर दिले. मी रूग्णालयात असतांना यांच्या रात्रीच्या हालचाली सुरू होत्या. हुडी घालून रात्री कोण फिरत होते ? याचे उत्तर आधी द्यावे असे म्हणत त्यांनी शिंदे आणि फडणवीस यांना लक्ष्य केले. तर, कुणीही दमदाट्या आणि पैशाचा वापर करून सरकार बनवू शकतो असंच सध्याचं चित्र आहे. त्यामुळे राईट टू रिकॉलचा अधिकार दिला पाहिजे. लोकप्रतिनिधींना बोलावण्याचा अधिकार दिला पाहिजे. त्यावर विचार व्हावा. देशाने विचार केला पाहिजे. चुकीचं काही करणार्‍या लोकप्रतिनिधीला बोलण्याचा अधिकार हवा अशी मागणी त्यांनी केली.

Protected Content