दगडावर पडल्याने जखमी तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षीय तरूणाचा तोल जावून अचानक दगडावर पडल्याने झालेल्या गंभीर दुखापतीमुळे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवारी १० जुलै रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिपक भगवान पाटील (वय-३२) रा. प्रशांत चौक, पिंप्राळा, जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दिपक पाटील हा तरूण शहरातील पिंप्राळा भागात आपल्या आई गंगूबाई यांच्यासोबत वास्तव्याला होता. प्लबिंगचे कामे करून आपला उदरनिर्वाह करत होता. रविवारी ९ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता दिपक हा कामावरून घरी येत असतांना अचानक त्यांचा तोल जावून खाली दगडावर पडला. यात त्यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याला स्थानिक नागरीकांनी घरी नेले. सोमवारी १० जुलै रोजी सकाळी त्याच्या पोटात त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांच्या मित्रांनी त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. दरम्यान, त्याच्यावर उपचार सुरू असतांना सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील करीत आहे.

Protected Content