जळगावच्या औद्योगिक क्षेत्रात जास्तीत जास्त संधी निर्माण करणार – अभिषेक पाटील

abhishek patil 5

जळगाव प्रतिनिधी । शहराच्या विकासासाठी मी वचनबध्द असून आपण सेवेची संधी दिल्यास समस्यामुक्त शहर दिल्यास समस्यामुक्त शहर निर्माण करू असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी दिले. त्यांनी गुरूवारी शहरातील विविध भागातील मतदारांशी संवाद साधला.

शहरातील औद्योगिक क्षेत्रात विकास साधला जाईल, बेरोजगारांच्या हाताला काम देण्याची जबाबदारी आपण स्वीकारू असेही अभिषेक पाटील यांनी मतदारांशी संवाद साधताना सांगितले. त्यांनी गुरूवारती भास्कर मार्केट, टागोरनगर, पोलीस मुख्यालय परीसरात रॅली काढली.

यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक. महानगर जिल्हाध्यक्ष नामदेवराव चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख लिलाधर तायडे, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, मिनल पाटील, किरण राजपूत, राजू मोरे, मंगला पाटील, विकास पवार, राजेश पाटील, आशा येवले, दुर्गेश पाटील, सचिन पाटील, रितेश पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

Protected Content