मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही : एकनाथ शिंदे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशातच, राज्यात महायुतीचे सरकार आल्यावर मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सूरू आहे. अशातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे विधान केले आहे. मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण मुख्यमंत्री महायुतीचाच होणार असे एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी आज एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवरही जोरदार टीका केली. ‘फोडा आणि राज्य करा’ हे काँग्रेसचे धोरण असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तसेच, राहुल गांधी बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट कधी म्हणणार? असा सवालही त्यांनी केला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की, मी माझ्या पक्षाचा काँग्रेस कधीच होऊ देणार नाही, पण उद्धव ठाकरे स्वत:च्या स्वार्थासाठी काँग्रेससोबत गेले.

आपल्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही, असे त्यांना वाटत होते. त्यामळेच त्यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. तसेच, नरेंद्र मोदी यांच्या ‘एक है तो सेफ है’ या घोषणेचे समर्थनही मुख्यमंत्री शिंदेंनी केले.

Protected Content