जळगाव जिल्हा मूकबधिर असोसिएशनचा आ. राजूमामा भोळे यांना पाठिंबा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील जळगाव जिल्हा मूकबधिर असोसिएशनने महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना एका पत्राद्वारे जाहीर पाठिंबा देऊन त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

एका पत्राद्वारे त्यांनी हा पाठिंबा दिला आहे. यापूर्वी आपण केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा आढावा घेऊन मतदार संघातील नागरिकांचे विविध प्रश्न आपण मार्गी लावले आहेत. तर भविष्यात शहरातील मूकबधिर, कर्णबधिर दिव्यांगांचे जिव्हाळ्याचे प्रश्न आपण सोडवू शकाल अशी आम्हाला खात्री आहे.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ आम्हाला मिळेल म्हणून आम्हाला आपल्यासारख्या कर्तव्यदक्ष व कृतीशील आमदाराची आवश्यकता आहे असा आशय पत्रामधून व्यक्त करण्यात आला आहे.

Protected Content