जिल्हा दुध संघाच्या निवडणूक : माघारी अंती ४० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा दुध संघाच्या निवडणूकीत सोमवारी २८ नोव्हेंबर रोजी उमेदवारी माघारी घेण्याची अंतिम मुदत होती. माघारी अंती ४० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहे. दरम्यान, सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेच्या दरम्यान शिंदे-भाजप आणि महाविकास आघाडीचे राजकीय द्वारबंद चर्चा करण्यात आले. दोन्ही गटातील उमेदवार निवडून येईल असा दावा दोन्ही पॅनलचे प्रमुख यांनी केला आहे.

जळगाव जिल्हा दुध संघाची निवडणूकीचे पडघम सुरू झाले आहे. निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माघारीची सर्वत्र चर्चा होती. सोमवारी २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेच्या दरम्यान अंतिम उमेदवारी अंर्ज माघारी घेण्याची मुदत देण्यात आली होती. अंतिम मुदत संपल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवाई यांनी निवडणूकीत उभे असलेल्या ४० उमेदवारांची अंतीम यांदी प्रसिध्द केली. यात पाचोरा मतदार संघात माजी आमदार दिलीप वाघ आणि आमदार किशोर पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला हेाता. दरम्यान, आमदार किशोर पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने माजी आमदार दिलीप वाघ यांची बिनविरोध वर्णी लागली आहे. दुसरी मुक्ताईनगर मक्ताईनगर मतदार संघात एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांच्या विरोधात आमदार मंगेश चव्हाण हे उभे आहे. अमळनेरात आमदार अनिल पाटील यांच्या विरोधात माजी आमदार स्मिता वाघ आहेत. जळगाव तालुका मतदार संघात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात महापौर जयश्री महाजन यांच्या सासू मालतीबाई महाजन उभे आहेत. तर जामनेर तालुक्यातून मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात दिनेश पाटील हे उभे आहे.

Protected Content