गरोदर पत्नीची निर्घृण हत्या

muder 3

 

बीड (वृत्तसंस्था) तुला काम येत नाही, स्वयंपाक करता येत नाही., असे म्हणून पतीने तीन महिन्यांच्या गरोदर पत्नीची गळा आवळून खून केल्याचा धक्कदायक प्रकार माजलगाव येथे उघडकीस आला आहे. जयश्री गणेश जगधने असे मृत विवाहितेचे नाव आहे.

 

दिवाळीसणाच्या तोंडावर जिल्ह्यातील माजलगाव येथे क्षुल्लक कारणावरून पतीने गरोदर पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हरकी लिमगाव येथे ही घटना घडली आहे. तुला काम येत नाही, स्वयंपाक करता येत नाही., असे म्हणून पतीने तीन महिन्यांच्या गरोदर पत्नीची गळा आवळून खून केला. या प्रकरणी पती गणेश सर्जेराव जगधने, सासरा सर्जेराव सटवाजी गजधने, सासू मुक्ताबाई सर्जेराव जगधने, दीर महेश सर्जेराव जगधने, ज्योतीराम नवनाथ जगधने, तुकाराम जगधने यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

Protected Content