जळगावात घरफोडी करणारी टोळी अखेर जेरबंद; एलसीबीची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगांव शहरात घरफोडी चोरीच्या प्रकारात मोठया प्रमाणात वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक महेश्वर रेडडी यांनी घरफोडी चोरी करणारे आरोपीचा शोध घेण्याबाबत बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना आदेशीत केले होते. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार पोउनि राहुल तायडे, सफी रवि नरवाडे, संजय हिवरकर, पोह/कमलाकर बागुल, संदीप पाटील, प्रविण मांडाळे, चालक मोतीलाल चौधरी यांचे एक पथक तयार करुन आरोपीतांचा शोध घेणेबाबत त्यांना योग्य त्या सुचना दिल्या होत्या.

पोलिस अधिक्षकांनी नेमून दिलेल्या या पथकातील पोलीस अंमलदार यांनी घरफोडी चोरी करणारे अज्ञात आरोपींचा गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढून सदर बातमीची शहानिशा केल्यानंतर संशयीत विशाल मुरलीधर दाभाडे, शुभम उर्फ मोनु प्रभाकर चव्हाण (दोन्ही रा. रामेश्वर कॉलनी जळगांव) यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून विचारपुस करत त्यांचा साथीदार विशाल संतोष भोई (रा. तांबापुरा जळगांव) यांच्यासह शहरातील शनिपेठ पो. स्टे. हददीतील दशरथ नगर व सुदर्शन पार्क तसेच जिल्हापेठ पो.स्टे. हददीतील चंद्रप्रभा कॉलनी अशा ठिकाणी घरफोडी केल्याचे कबुल केले. त्याबाबत खात्री करता शनिपेठ पो स्टे गुरन १३५/२०२४ कलम ४५७,४५४. ३८०, गुरन १४८/२०२४ भादंवि कलम ३०५, ३३१ (४), त्याच प्रमाणे जिल्हा पेठ पोलीस स्टेशन जळगांव हददीत जिल्हा पेठ पो स्टे गुरन १७५/२०२४ भादंवि कलम ४५७,४५४, ३८० असे गुन्हे अज्ञात आरोपी विरुध्द दाखल असल्याने असे एकूण घरफोडीचे ०३ गुन्हे उघडकीस आले आहेत.

सदर गुन्हयांत चोरी केलेले सोन्या-चांदीचे दागिने हे सराफ बाजारातील नेताजी पंढरीनाथ जगताप यांना दिल्याचे सांगितले. त्यावरुन नेताजी पंढरीनाथ जगताप यांना वरील आरोपी समक्ष विचारपुस करता त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिल्याने त्यांस सुध्दा सदर गुन्हयांत ताब्यात घेण्यात आले. वरील घरफोडीतील निष्पन्न आरोपीतांना शनिपेठ पो.स्टे. ला गुरन १४८/२०२४ भादंवि कलम ३०५, ३३१(४) या गुन्हयांत पुढील कार्यवाहीसाठी देण्यात आले आहे

Protected Content