Home क्राईम चिदंबरम यांची १९ सप्टेंबरपर्यंत तिहार तुरुंगात रवानगी

चिदंबरम यांची १९ सप्टेंबरपर्यंत तिहार तुरुंगात रवानगी

0
107


chidambaram759

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना येथील राऊज अॅव्हेन्यू कोर्टाने १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामुळे त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात येणार आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणात गैरव्यवहार केल्याचा चिदंबरम यांच्यावर आरोप आहे.

 

चिदंबरम हे सध्या सीबीआयच्या कोठडीत होते. दोन दिवसांच्या सीबीआय कोठडीनंतर त्यांना आज दिल्लीतील कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी सुनावणीत चिदंबरम यांना न्यायालयीन कोठडीची मागणी सीबीआयने केली. तर चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी सीबीआयच्या या मागणीला विरोध केला. यामुळे कोर्टाने आपला निर्णय काही कालावधीसाठी राखून ठेवला होता. यानंतर पुन्हा झालेल्या सुनावणीत कोर्टाने चिदंबरम यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. असे असले तरी तुरुंगात चिदंबरम यांना झेड दर्जाची सुरक्षा पुवरण्यात येणार आहे. तसंच त्यांना वेगळ्या कोठडीतही ठेवण्यात येणार आहे.


Protected Content

Play sound